
भारताविरुद्ध नेहमी गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या निधनाचे वृत्त शनिवारी येऊन धडकले. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला, त्यात न्यूज अँकर शाहिद आफ्रिदीच्या निधनाची बातमी सांगत आहेत. दृश्यांमध्ये रुग्णवाहिका दिसत आली आहे आणि त्यामुळेच हे वृत्त खरं वाटत आहे. आफ्रिदीच्या निधनाच्या या वृत्ताने क्रिकेट वर्तुळात शोक व्यक्त केला जातोय. काही दिवसांपूर्वीपर्यंत आफ्रिदी त्याच्या भारतविरोधी विधानांमुळे चर्चेत आला होता.