भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीत करुण नायरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले.
तीन सामन्यांत फक्त १३१ धावा केल्यामुळे नायरला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय झाला.
SAKAL.COM च्या फॅक्ट चेकनुसार हा फोटो लॉर्ड्स कसोटीतील आहे, ओल्ड ट्रॅफर्डमधील नाही.
Karun Nair emotional reaction after exclusion from IND vs ENG 4th Test : भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल करताना करुण नायरला बाहेरचा रस्ता दाखवला. ८ वर्षानंतर करुण नायरचे भारताच्या कसोटी संघात पुनरागमन झाले होते, परंतु चौथ्या कसोटीत त्याला बाकावर बसवले गेले. त्यानंतर सोशल मीडियावर त्याचा एक भावनिक झालेला फोटो व्हायरल झाला आहे आणि त्यात नायर रडत असल्याचा दावा केला जात आहे. आपल्या मित्राला सावरण्यासाठी लोकेश राहुल त्याच्यासोबत दिसत आहे. त्यामुळे करुण आता निवृत्ती जाहीर करतोय, असाही दावा केला जातोय.