
Pakistan vs New Zealand: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ क्रिकेट स्पर्धेत बुधवारी (१९ फेब्रुवारी) झालेल्या सलामीच्या सामन्यात यजमान पाकिस्तानला न्यूझीलंडकडून ६० धावांनी पराभूत व्हावे लागले. त्यामुळे पाकिस्तानसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यातच त्यांना मोठा धक्का बसला तो फखर जमान स्पर्धेतून बाहेर झाल्याने. या सामन्यावेळी फखर जमानला अश्रुही अनावर झाले होते.
झाले असे की या सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर फखरला दुखापत झाली. सामन्याच्या पहिल्याच षटकात सीमारेषेजवळ चेंडू अडवताना फखरची खाली पडल्यामुळे बरगडी दुखावली. काही वेळ उपचार घेतल्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी आला. फलंदाजीसाठी मात्र तो सलामीला आला नाही.