१४ वर्षीय वैभव सूर्यवंशी सध्या विराटच्या चाहत्यांच्या रडारवर आहे
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या वैभवच्या फोटोमुळे हा वाद निर्माण झाला आहे
वैभवने कसोटीत १८ क्रमांकाची जर्सी परिधान केल्याने चाहते संतापले आहेत
भारताचा युवा सुपरस्टार वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Suryavashi) सध्या इंग्लंड दौरा गाजवतोय. ट्वेंटी-२० व वन डे मालिकेत दमदार कामगिरीनतंर पहिल्या कसोटीतही त्याने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवणारा खेळ केला. पण, विराट कोहलीच्या चाहत्यांच्या तो डोक्यात गेला आहे आणि त्याला कारण ही कसोटी मॅचच ठरली आहे.