पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला आहे. भारताने या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) असे नाव दिले आहे. या हल्ल्यात जैशच्या 3 कमांडरसह ९० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.