

Finn Allen Breaks Yuvraj Singh's 19-Year-Old Record
Sakal
Finn Allen Breaks Yuvraj Singh's 19-Year-Old Record: न्यूझीलंडने टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दणक्यात प्रवेश केला आहे. त्यांनी बुधवारी (४ मार्च) कोलकाताला झालेल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला ९ विकेट्सने पराभूत केले. यासह अंतिम सामना गाठला.
न्यूझीलंडच्या विजयात टीम सिफर्ट (Tim Seifert) आणि फिन अॅलेन (Fin Allen) यांनी मोलाचा वाटा उचलला. फिन अॅलेनने तर अफलातून फटकेबाजी करताना शतक झळकावत अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली. त्याने युवराज सिंगचा (Yuvraj Singh) १९ वर्षे जुना विक्रमही मोडला.