FINN ALLEN’S EXPLOSIVE CENTURY IN BBL 2026 | KKR IPL 2026
esakal
KKR bargain buy Finn Allen explosive batting: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ तोंडावर असताना कोलकाता नाइट रायडर्सला ( KKR) आनंदाची बातमी मिळाली आहे. KKR ने लिलावात २ कोटींत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलेल्या फिन अॅलन याने बिग बॅश लीगमध्ये वादळी शतक झळकावले. फिनने ५१ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि पर्थ स्कॉचर्स संघाकडून झळकलेले हे दुसरे वेगवान शतक ठरले. त्याच्या शतकाच्या जोरावर स्कॉचर्सने दोनशेपार लक्ष्य उभे केले आणि मेलबर्न रेनेगेड्सवर दणदणीत विजय मिळवला.