Finn Allen Hits 19 Sixes to Rewrite T20 History in Major League Cricket
अमेरिकेत मेजर लीग क्रिकेटला कालपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच सामन्यात विक्रमांचा पाऊस पडला. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स विरुद्ध वॉशिंग्टन फ्रीडम या दोन संघांमध्ये हा सामना झाला. युनिकॉर्न्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २६९ धावा चोपल्या आणि प्रत्युत्तरात आलेल्या फ्रीडम संघाचा डाव १३.१ षटकांत १४६ धावांवर गुंडाळून १२३ धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली. या सामन्यात फिन अॅलन याने विश्वविक्रमी खेळी केली.