First time in 148 years a team lost after 5 tons in one Test : रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर खेळवल्या गेलेल्या पहिल्याच कसोटीत टीम इंडियाला हार पत्करावी लागली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने फलंदाजीत 'बॅझबॉल'स्टाईलला टक्कर देणारी खेळी केली, परंतु इंग्लंडचा संघ त्यालाही पुरून उरला. इंग्लंडने ३७१ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आणि ५ विकेट्स राखून मॅच जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या पराभवामुळे टीम इंडियाच्या नावावर मात्र नकोसा विक्रम नोंदवला गेला आणि कसोटी क्रिकेटच्या १४८ वर्षांच्या इतिहासात असा लाजीरवाणा पराक्रम करणारा भारत हा पहिलाच संघ ठरला.