INDIA BEAT ENGLAND IN SF: LAST FIVE OVERS SEAL HISTORIC WIN ( Photo Credit : Vijay Bate)
esakal
India vs England T20 World Cup 2026 semi final highlights: भारतीय संघाने मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर उपांत्य फेरीत इंग्लंडवर रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात ३४ षटकारांचा पाऊस पडला, जो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक षटकारांचा सामना ठरला. भारताच्या ७ बाद २५३ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने ७ बाद २४६ धावांपर्यंत मजल मारून भारतीय चाहत्यांना शेवटच्या क्षणापर्यंत तव्यावर ठेवले होते. भारताच्या या अविश्वसनीय विजयात पाच खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले.