L,L,L,L,L! पंजाब किंग्स प्ले ऑफमध्ये कसा पोहोचणार? उर्वरित सामन्यात कोणाला भिडणार? जाणून घ्या IPL 2026 PLAYOFF SCENARIO

How can Punjab Kings qualify for IPL 2026 playoffs? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये एकेकाळी पॉइंट्स टेबलवर अव्वल असलेला पंजाब किंग्स संघ आता मोठ्या संकटात सापडला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर PBKS चा सलग पाचवा पराभव नोंदवला गेला आणि त्यांच्या प्ले ऑफच्या आशांनाही मोठा धक्का बसला.
How can Punjab Kings qualify for IPL 2026 playoffs

How can Punjab Kings qualify for IPL 2026 playoffs

esakal

Updated on

PBKS playoff scenario after five consecutive defeats : सलग पाचव्या पराभवामुळे पंजाब किंग्सचा संघ हताश झालेला दिसत आहे. त्यांचे गुणफलकावरील १३ गुण बऱ्याच काळापासून तिथेच स्थिरावले आहेत आणि आता प्लेऑफच्या शर्यतीत CSK आणि RR हे संघ त्यांच्या अगदीच मागे आहेत. पंजाबच्या गोलंदाजांना पुन्हा एकदा अपयश आले आहे. फलंदाजीमध्ये त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली नसली, तरीही त्यांनी कसाबसा २०० धावांचा डोंगर उभारला. पण, गोलंदाजीत ते कमी पडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com