India vs Australia 2025 ODI series: भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्स राखून सहज पराभूत केले. या सामन्यात भारतीय संघ तीन अष्टपैलू खेळाडू घेऊन मैदानात उतरला होता, परंतु अपेक्षित धावा भारताला उभ्या करता आल्या नाही. पावसामुळे हा सामना २६-२६ षटकांचा झाला आणि ९ विकेट्स भारत १३६ धावांपर्यंत पोहोचला. या सामन्यात कुलदीप यादवला ( Kuldeep Yadav) न खेळवण्यावरून महान फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याने संघ व्यवस्थापनाला सवाल केले आहेत.