India C team can beat Pakistan controversy
esakal
India vs Pakistan latest verbal war former India captain comment: भारत-पाकिस्तान यांच्यातल्या क्रिकेट सामन्याची जी हवा केली जातेय, ती थांबला असा सल्ला भारताचे माजी कर्णधार कृष्णमचारी श्रीकांत यांनी दिला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या लढतीत भारतीय संघाने एकतर्फी निकाल लावताना पाकिस्तानला ६१ धावांनी हार पत्करण्यास भाग पाडले. पाकिस्तान संघाने भारतासमोर अक्षरशः शरणागती पत्करली. भारताची C टीमही पाकिस्तानच्या या संघाला सहज पराभूत करेल असा दावा करून श्रीकांत यांनी पाकिस्तानचा अपमानच केला. भारताने हा सामना जिंकून पाकिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील जय-पराजयाची आकडेवारी ८-१ अशी वाढवली.