

India vs England: भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत पराभवाचा सामना केला असला, तरी संघासाठी काही सकारात्मक गोष्टी घडल्या, त्यातील एक म्हणजे नितीश कुमार रेड्डी. नितीशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत काही महत्त्वाच्या खेळी केल्या.
तो या मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणाराही दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला. त्याने ५ सामन्यांत २९८ धावा करण्यासोबत ५ विकेट्सही घेतल्या. त्याची ही कामगिरी पाहाता त्याला आता आगामी मालिकांसाठीही भारतीय संघात हार्दिक पांड्यासाठी बॅकअप पर्याय म्हणून संधी दिली जाणार का अशी चर्चा होत आहे.