Should Vaibhav Suryavanshi move beyond U-19 level: भारताचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी क्रिकेटचं मैदान गाजवतोय.. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या लिलावापासून ते अगदी भारताच्या १९ वर्षांखालील संघापर्यंत वैभवने वयाच्या १४ व्या वर्षी अनेक वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केले आहे. सध्या तो १९ वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळतोय, परंतु अमेरिकेविरुद्धच्या लढतीत त्याला अपयश आले. मात्र, त्याच्याकडून भारतीयांना खूप अपेक्षा आहेत. अशात त्याला १९ वर्षांखालील संघात खेळवणे बंद केले पाहिजे, असे विधान भारताचे माजी क्रिकेटपटू डब्लूव्ही रमण ( WV Raman ) यांनी केले आहे. त्यामागचं कारणही त्यांनी समजावून सांगितलं आहे.