
मागील दोन वर्षांत बाबर आझमला एकही शतक झळकावता आलेले नाही
३० वर्षीय फलंदाज मागील ७२ डावांत तिहेरी आकडा गाठता आलेलाा नाही.
विराट कोहलीसोबतच्या तुलनेने त्याच्यावरील मानसिक दडपण वाढतेय
Ahmed Shehzad statement on Babar Azam’s mental pressure: पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याची तुलना नेहमी जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली याच्यासोबत केली जात आहे. पाकिस्तानींना बाबर हा विराटच्याही एक पाऊल पुढे जाईल असे स्वप्न पडतात.. बाबरच्या फलंदाजीत विराटची शैली दिसत असल्याचा दावाही केला जातोय. पण, आता बाबरचा फॉर्म ढासळला आहे आणि त्यामागे विराट जबाबदार असल्याचा दावा पाकिस्तानचा माजी सलामीवीर अहमद शहजाद याने केला आहे.