Bernard Julien, 1975 World Cup-winning all-rounder for West Indies, has passed away at the age of 75
esakal
Bernard Julien Passes Away at 75 : क्रिकेट विश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडिज संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि १९७५ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील प्रमुख खेळाडू बेर्नार्ड ज्युलियन यांचे निधन झाले आहे. उत्तर त्रिनिदाद येथील वॅलसायन येथे त्यांनी ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ज्युलियन यांनी १९७५ च्या वर्ल्ड कप विजयात वेस्ट इंडिजसाठी महत्त्वाची कामगिरी केली होती.