Over 100 Matches in July 2025 across 12 International Series and 7 T20 Leagues : भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीला उद्यापासून सुरुवात होणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारताचा केवळ पुरुष संघच नव्हे तर, महिला संघ, १९ वर्षांखालील मुलांचा संघ, इमर्जिंग संघ आणि मिश्र दिव्यांग संघही दाखल झाला आहे. त्यामुळे जुलै महिना भारतीयांसाठी पर्वणीचा ठरणार आहे. England vs India च नव्हे, तर जुलै महिन्यात जवळपास १२ आंतरराष्ट्रीय मालिका होणार आहेत, त्याशिवाय ७ वेगवेगळ्या ट्वेंटी-२० लीग्सही खेळवल्या जाणार आहेत. जवळपास १०० हून अधिक सामन्यांची मेजवानी घेऊन हा जुलै महिना आला आहे.