India vs Pakistan Women’s ODI World Cup 2025 match date and venue
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी सडेतोड उत्तर दिले. दोन्ही देशांमध्ये युद्धही भडकले. पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर त्यांच्यासोबत क्रिकेट सामनेही खेळणे बंद करा असा सूर आवळला गेला. पण, आताच हाती आलेल्या बातमीनुसार India vs Pakistan यांच्यात ५ ऑक्टोबरला महामुकाबला होणार आहे. २०२५ मध्ये ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महिलांच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक समोर आले आहे आणि आता भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख समोर आल्याने क्रिकेट चाहत्यांची उत्सुकला शिगेला पोहोचली आहे.