
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी के. एल. राहुल यालाच यष्टिरक्षणासाठी पहिले प्राधान्य असेल, असे स्पष्ट मत अहमदाबाद येथील अखेरच्या एकदिवसीय सामन्यानंतर व्यक्त केले.
गौतम गंभीर यांच्या वक्तव्यामुळे आता आगामी चॅम्पियन्स करंडकामध्येही रिषभ पंत याला टीम इंडियाच्या अंतिम अकरा जणांच्या चमूतून बाहेरच बसावे लागणार आहे, याचे संकेत मिळाले.