Gautam Gambhir on Sanju Samson future
esakal
Gautam Gambhir press conference on Sanju Samson: भारतीय संघाला तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. संजू सॅमसनच्या जागी संघात स्थान मिळालेल्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला सलग दुसऱ्या सामन्यात अपयश आले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ विजेत्या संघातील स्टार फलंदाज संजूला इंग्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांत बाकावर बसवले गेले आहे. संजूला मागील तीन सामन्यांत केवळ ६ धावा करता आल्याने, हा निर्णय घेतला गेला. त्यात झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतूनही संजूला वगळण्यात आल्याने केरळच्या या फलंदाजाच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.