T20 World Cup 2026: गौतम गंभीरने जेतेपदाची ट्रॉफी ३ जणांना केली समर्पित; पहिले नाव राहुल द्रविडचे, अन्य दोघंही तितकेच महत्त्वाचे

Gambhir statement after India T20 World Cup 2026 win: टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी एक भावनिक वक्तव्य करत ही ऐतिहासिक ट्रॉफी तीन महत्त्वाच्या व्यक्तींना समर्पित केली. गंभीर यांनी सर्वप्रथम भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे नाव घेत त्यांच्या भारतीय क्रिकेटसाठीच्या योगदानाचे कौतुक केले.
Gautam Gambhir dedicates T20 World Cup to Rahul Dravid and VVS Laxman

Gautam Gambhir dedicates T20 World Cup to Rahul Dravid and VVS Laxman

esakal

Updated on

Team India coach Gautam Gambhir reaction after World Cup win: भारतीय संघाने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताने आज २०२६ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडचा पराभव करून जेतेपदाची ट्रॉफी कायम राखली. सलग दोन वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला. गौतम गंभीरने या संघात व्यक्तिपूजेला फाटा देत संघहिताला महत्त्व दिले आणि त्याने काही कठोर निर्णयही घेतले. पण, आज या विजयाने त्याच्या सर्व रणनीतीला यश प्राप्त झाले. मात्र या विजयानंतर गौतमने तीन लोकांना ही ट्रॉफी समर्पित केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com