
भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तेंडुलकर - अँडरसन ट्रॉफी ही ५ सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्लेमध्ये भारताने पाचव्या दिवसाच्या (२४ जून) शेवटच्या सत्रात गमावला.
इंग्लंडने ५ विकेट्सने हा सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. शेवटपर्यंत दोन्ही संघात या सामन्यात चुरस पाहायला मिळाली होती. पण अखेर इंग्लंडने बाजी मारली. पहिल्या सामन्यात भारताकडून काही चुका झाल्या, ज्या महागातही पडल्या.