
आयपीएल २०२५ स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी गेल्या आठवड्यात भारतीय संघाची घोषणाही झाली. मात्र सर्वांना धक्का बसला तो श्रेयस अय्यरला संधी न मिळाल्याने.
श्रेयस अय्यरने गेल्या वर्षभरात केलेल्या कामगिरीनंतर तो कसोटीत पुनरागमन करेल, असे अनेकांना अपेक्षित होते.