
भारतीय क्रिकेट वर्तुळात गेल्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या. रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंनी एकापाठोपाठ एक कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली. रोहित शर्माने ७ रोजी आणि विराट कोहलीने १२ रोजी कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीबद्दल माहिती दिली.
पुढच्या महिन्यात होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी या दोघांनी निवृत्ती अचानक जाहीर केल्याने विविध चर्चाही झाल्या. काहींनी त्यांना कसोटीतून निवृत्ती घेण्यास भाग पाडले का, असाही प्रश्न उपस्थित केला. आता भारताला त्या दोघांच्या अनुभवाशिवाय इंग्लंड दौऱ्यात खेळावे लागणार आहे. आता त्यांच्या निवृत्तीवर भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने मौन सोडले आहे.