Mohammed Shami fitness update for England Test series 2025 : इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होणार आहे. मात्र, या दौऱ्यातून अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला वगळलं जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने शमी लांबलचक स्पेल टाकण्यासाठी सक्षम नसल्याचा अहवाल दिल्याची महिती आहे. जर शमीला इंग्लंड दौऱ्यातून वगळण्यात आलं तरी त्याच्याऐवजी कुणाला संधी मिळणार याची चर्चा आता सुरु झाली आहे.