

Gautam Gambhir reaction on India Test cricket failures
esakal
Why India struggling in Test cricket analysis? भारतीय संघाने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या ( Gautam Gambhir) याच्या मार्गदर्शनाखाली मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. २०२४ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ एकही सामना हरला नाही, तर २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी मालिका कायम राखताना जेतेपद पटकावले. त्यानंतर आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ जिंकला. पण, कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाला फक्त बांगलादेश आणि वेस्ट इंडिज या दुबळ्या संघांविरुद्ध मालिका जिंकता आली. भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून व्हाईटवॉश पत्करावा लागला, तर २०२४-२५ ची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमवावी लागली.