

Gautam Gambhir - Sanju Samson | India vs West Indies | T20 World Cup
Sakal
Gautam Gambhir praise Sanju Samson 97 Runs: भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे. रविवारी (१ मार्च) कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या सुपर-८ सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला ५ विकेट्सने पराभूत केले.
हा विजय भारतीय संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहचवण्यास महत्त्वाचा ठरला. या सामन्यात दोन्ही संघांसाठी 'आर या पार'ची लढाई होती. अशात या महत्त्वाच्या सामन्यात संजू सॅमसनने (Sanju Samson) अफलातून खेळ केला.