गौतम गंभीर, सूर्यकुमार यादव यांनी संजू सॅमसनची मदत करायला हवी! अजिंक्य रहाणेची विनंती; म्हणाला, त्याला एकटं पाडू नका...

Ajinkya Rahane advice on Sanju Samson form: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन सध्या खराब फॉर्ममुळे चर्चेत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत अपेक्षित कामगिरी न झाल्यामुळे त्याच्यावर दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर माजी भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने महत्त्वाचं मत मांडलं आहे.
Ajinkya Rahane has urged Gautam Gambhir and Suryakumar Yadav to support Sanju Samson

Ajinkya Rahane has urged Gautam Gambhir and Suryakumar Yadav to support Sanju Samson

esakal

Updated on

Gautam Gambhir Suryakumar Yadav support Sanju Samson: शुभमन गिलची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड न झाल्याने संजू सॅमसनचे सलामीला खेळणे निश्चित झाले. पण, मिळालेल्या संधीवर संजूला चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्याचे दिसतेय. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तीन सामन्यांत तो फक्त १६ धावा करू शकला आहे. कालच्या तिसऱ्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला. अशात त्याचा आत्मविश्वास खचत चालला आहे आणि त्याच्यावर संघातील स्थान गमावण्याचे दडपण वाढतेय. इशान किशन दमदार कामगिरी करतोय आणि तिलक वर्माच्या पुनरागमनाने संजूचे सलामीचे स्थान धोक्यात येण्याची चर्चा सुरू झाली आहे. अशात भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) याने एक सल्ला दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com