तुमचा वाद मिटवा, भारतीय संघाचं नुकसान होतंय! गौतम गंभीर-अजित आगरकर यांच्यात वाद? दिनेश कार्तिकच्या विधानाने खळबळ

Gambhir and Agarkar selection controversy: इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकांमध्ये भारताला एकही सामना जिंकता न आल्याने संघाच्या कामगिरीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Dinesh Karthik on Gautam Gambhir and Ajit Agarkar

Dinesh Karthik on Gautam Gambhir and Ajit Agarkar

esakal

Updated on

Dinesh Karthik on Gautam Gambhir and Ajit Agarkar: भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक याने राष्ट्रीय संघाच्या निवडीवरून राग व्यक्त केला आहे. संघ व्यवस्थापन आणि निवड समिती यांच्यातील वैचारिक मतभेद त्वरित दूर करण्याचे आवाहनही त्याने केले आहेत. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व निवड समिती प्रमुख अजित आगरकर, यांच्यात समन्वय नसल्यामुळे गडबड होत असल्याचे कार्तिकने अप्रत्यक्षपणे सांगितले. त्याचा फटका भारतीय संघाला बसला आणि नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-२० मालिकांमध्ये आयर्लंड व इंग्लंडकडून लाजीरवाणी हार पत्करावी लागली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com