Ashes 3rd Test AUS vs ENG Nathan Lyon overtakes Glenn McGrath wickets
esakal
Ashes 3rd Test AUS vs ENG Nathan Lyon overtakes Glenn McGrath wickets: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीत चुरस पाहायला मिळत आहे. जोफ्रा आर्चरच्या ५ विकेट्समुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३७१ धावांवर आटोपला. इंग्लंडनेही अवघ्या ७१ धावांत ४ विकेट्स गमावल्या आहेत. नॅथन लायन आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. नॅथन लायनने १०व्या षटकात बेन डकेटची ( २९) विकेट घेताच कॅमेरा समालोचक कक्षात बसलेल्या ग्लेन मॅकग्राथकडे वळला.. मॅकग्राथने हात उंचावले अन् नंतर उठला व फेकायला खूर्ची उचलली... नेमकं असं काय घडलं त्या विकेटने?