PAK vs OMN : पाकिस्तानचा हा संघ भारताविरुद्ध खेळणार आहे का? ओमानविरुद्धचा खेळ पाहून उडतेय खिल्ली... डोळेझाप फलंदाजी

Asia Cup 2025 PAK vs OMN Marathi News : आशिया चषक २०२५ स्पर्धेत पाकिस्तानचा संघ ओमानविरुद्ध पहिल्याच लढतीत धडपडताना दिसला. पाकिस्तानचा सलामीवीर सैम आयूब पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला आणि त्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर खिल्ली उडवायला सुरुवात केली.
Pakistan vs Oman Asia Cup 2025 live updates in Marathi

Pakistan vs Oman Asia Cup 2025 live updates in Marathi

esakal

Updated on

Asia Cup 2025 Pakistan vs Oman Live Marathi Update: आशियातील दोन तगडे संघ भारत व पाकिस्तान येत्या रविवारी समोरासमोर येणार आहेत. आशिया चषक स्पर्धेत उभय संघामधील सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. त्याआधी भारतीय संघाने संयुक्त अरब अमिरातीवर दणदणीत विजय मिळवून शेजाऱ्यांना इशारा दिला. त्यात पाकिस्तान आज ओमानविरुद्ध दम दाखवण्याच्या प्रयत्नात धापा टाकताना दिसत आहेत. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, परंतु त्यांचे फलंदाज संघर्ष करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com