GT vs CSK Live: शुभमन गिल Out असूनही मैदानावर उभा राहिला, चेन्नईचा तिथेच कार्यक्रम झाला; गुजरातच्या कर्णधाराने मोडले अनेक विक्रम

Shubman Gill breaks IPL opening partnership record against CSK : गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात नशिबाची साथ मिळाल्यानंतर CSK चा अक्षरशः कार्यक्रम केला.
Shubman Gill turned a lucky escape into a historic innings against CSK

Shubman Gill turned a lucky escape into a historic innings against CSK

esakal

Updated on

Gujarat Titans vs Chennai Super Kings Marathi Cricket update: गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला ( Shubman Gill) चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात नशिबाची साथ मिळाली. आठव्या षटकात गुरजपनीत सिंगच्या गोलंदाजीवर पुल शॉट खेळताना गिलच्या बॅटची कड लागल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. मात्र यष्टिरक्षक उर्विल पटेलने जोरदार अपील केले नाही आणि गोलंदाजाही तितका उत्सुक दिसला नाही. जीवदान मिळाल्यानंतर गिलने आक्रमक फलंदाजी करत गुजरातला मजबूत स्थितीत पोहोचवले. त्याचबरोबर त्याने अनेक विक्रमांनाही गवसणी घातली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com