Sanju Samson injured during GT vs CSK IPL 2026 match
esakal
Gujarat Titans vs Chennai Super Kings Marathi Cricket update: चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या प्ले ऑफमध्ये राहायचे असल्यास विजयाशिवाय पर्याय नाही. त्यात आज त्यांच्यासमोर गुजरात टायटन्सचे आव्हान आहे आणि ते आधीच प्ले ऑफमध्ये पोहोचले आहेत. पण, त्यांना क्वालिफायर १मध्ये आपली जागा पक्की करायची आहे. दोन्ही संघांना मागील सामन्यात हार पत्करावी लागली आहे आणि अंतिम टप्प्यापूर्वी विजयपथावर परतण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. GT vs CSK सामन्यात गुजरातकडे ५-४ अशी आघाडी आहे आणि अहमदाबादमध्ये गुजरातने दोन्ही सामने जिंकले आहेत.