GT vs KKR Live : कॅमेरून ग्रीनला सूर गवसला, ११ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; पण, कोलकाताने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या अन्...

IPL 2026 GT vs KKR Marathi Cricket News: गुजरात विरुद्ध कोलकाता सामन्यात एकाच वेळी दोन वेगवेगळे चित्र पाहायला मिळाले. एका बाजूला Cameron Green याने अवघ्या ११ चेंडूत ५२ धावांची तुफानी खेळी करत सामना रंगवला, तर दुसऱ्या बाजूला Kolkata Knight Riders चा फलंदाजीचा डाव पूर्णपणे कोसळला.
Cameron Green smashes a fiery 52 off 11 balls as Gujarat Titans bounce back against Kolkata Knight Riders.

Cameron Green smashes a fiery 52 off 11 balls as Gujarat Titans bounce back against Kolkata Knight Riders.

Updated on

Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Marathi Updates: कोलकाता नाइट रायडर्सच्या फलंदाजांनी पुन्हा निराश केले. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध कॅमेरून ग्रीन ( Cameron Green) वगळल्यास इतरांनी निराश केले. ग्रीनने KKR च्या रोव्हमन पॉवेल व अनुकुल रॉय यांच्यासह दमदार भागीदारी करून संघाला सुस्थितीत आणले होते. रिंकू सिंगला संधी मिळत नाही, अशी बोंब होती. पण, आज पाच षटकं हाताशी असूनही तो १ धावेवर माघारी परतला. GT च्या गोलंदाजांनी चेंडूला सुरेख टप्प्यात व लाईन लेंथवर टाकून KKR ला धक्के दिले. कोलकाताने शेवटच्या षटकांत २६ धावांत ५ विकेट्स गमवाल्याने गुजरातला सामन्यात पुनरागमनाची संधी मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com