

cameron green
Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Marathi Updates: कॅमेरून ग्रीनला अखेर सूर गवसला... २५.२ कोटींच्या या खेळाडूने कोलकाता नाइट रायडर्ससाठी इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये शुक्रवारी दमदार खेळी करून दाखवली. ३२ धावांत ३ फलंदाज माघारी परतले असताना ग्रीनने सुरुवातीला रोव्हमन पॉवेलसह ५५ धावा जोडल्या आणि त्यानंतर अनुकुल रॉयसह १८ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ग्रीनने आकाश शर्माच्या चेंडूवर माँस्टर सिक्स मारला आणि तो सीमारेषेवरील Tata Sierra गाडीवर जाऊन आदळला. त्यामुळे गाडीला डेंट आला, पंरतु ग्रीनच्या या सिक्समुळे टाटाला ५ लाख रुपये बक्षीस म्हणून द्यावे लागले.