Hardik Pandya reaction on Jasprit Bumrah's role in Mumbai Indians
esakal
Hardik Pandya's explanation on Jasprit Bumrah not bowling with the new ball: मुंबई इंडियन्सने आज सर्व आघाड्यांवर दमदार कामगिरी करताना गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय मिळवला. सुरुवातीला अडखळल्यानंतर तिलक वर्मा व नमन धीर यांनी MI चा डाव सावरला. त्यानंतर तिलकने ४५ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांसह १०१ धावांची नाबाद खेळी करून संघाला ५ बाद १९९ धावांपर्यंत पोहोचवले. GT ला या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही आणि ते १५.४ षटकांत १०० धावांवर तंबूत परतले. अश्वनी कुमार ( ४-२४), अल्लाह गजनफर ( २-१७) व मिचेल सँटनर ( २-१८) यांनी उल्लेखनीय गोलंदाजी केली. नमन धीरने टिपलेला झेल विसरता येणार नाही. सामन्यानंतर हार्दिक पांड्याचे ( Hardik Pandya) एक विधान चर्चेत आले आहे.