

Gujarat Titans
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेला २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी जवळपास सर्व संघांच्या सरावाला सुरू झाली आहे. या नव्या हंगामापूर्वी अनेक संघांच्या खेळाडूंमध्ये तर बदल झालाच आहे, पण त्यासोबतच काहींच्या सपोर्ट स्टाफमध्येही मोठे बदल झाले आहेत.
यादरम्यान आता शुभमन गिल कर्णधार असलेल्या गुजरात टायटन्सनेही (Gujarat Titans) मंगळवारी (१० मार्च) नव्या फलंदाजी प्रशिक्षकाची (Batting Coach) घोषणा केली आहे.