IPL 2026 Update: RCB Split Home Games Between Bengaluru and Raipur
esakal
Why RCB playing 2 home matches in Raipur IPL 2026: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मागच्या वर्षी आयपीएल जेतेपद पटकावल्यानंतर विजयी जल्लोष करताना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यात ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या स्टेडियमवर आयपीएल २०२६ चे सामने होण्यास सुरुवातीला नकारच होता. त्यामुळेच RCB ने नवी मुंबई व पुणे येथील स्टेडियमची चाचपणी केली होती. पण, नवी मुंबईतील स्टेडियमवर RCB च्या होम मॅचला मुंबई इंडियन्सने विरोध केला. अखेर आज गतविजेत्यांसाठी महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे.