

Gujarat Titans sign Connor Esterhuizen as replacement for injured Tom Banton
esakal
Gujarat Titans squad changes IPL 2026 full details: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी मैदानावर उतरणाऱ्या गुजरात टायटन्सची ताकद वाढली आहे. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध आज ते अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळणार आहे. सलग दोन पराभवानंतर शुभमन गिलच्या संघाची गाडी रूळावर आली. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सवर त्यांनी रोमहर्षक विजय मिळवले. आता त्यांच्यासमोर दुबळा KKR चा संघ आहे आणि त्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा फलंदाज टॉम बँटन याने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे.