U19 IND vs U19 PAK: रोमहर्षक सामन्यात भारताचा पराभव! हमजा जहूरच्या पाकिस्तानचा विजय, आता Asia Cup सेमीफायनलसाठी समीकरण काय?

India U19 Defeated by Pakistan in U19 Asia Cup: १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानसाठी हमजा जहूरने शतक करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
India vs Pakistan U19 Asia Cup

India vs Pakistan U19 Asia Cup

Sakal

Updated on: 

U19 Asia Cup 2026, IND vs PAK: रविवारी (८ नोव्हेंबर) १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेतील साखळी फेरीत भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. शेवटपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने ३ विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तानने सलग दुसऱ्या विजयासह उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के केले आहे.

मात्र आता भारताला उपांत्य फेरीत पोहोचायचे असेल, तर साखळी फेरीतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात युएईला पराभूत करावेच लागणार आहे. जर १० नोव्हेंबरला होणारा हा सामनाही भारतीय संघ पराभूत झाला, तर मात्र भारताचे आव्हान संपेल.

India vs Pakistan U19 Asia Cup
U19 Asia Cup: IND vs PAK सामन्यात ड्रामा! नॉ-बॉलवर भारतीय फलंदाजाला आऊट दिलं? यशवर्धनच्या विकेटवरून वाद
Loading content, please wait...