

Harbhajan Singh On Gautam Gambhir
esakal
Harbhajan Singh On Gautam Gambhir: भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग(Harbhajan Singh ) सध्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. सध्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यावर होत असलेल्या सततच्या टीकेमुळे हरभजन सिंगने आपलं मत व्यक्त केलं आहे.
गंभीरची खरं सांगण्याची शैली बऱ्याच जणांना फारशी आवडत नाही, असं माजी फिरकीपटू हरभजन सिंगने पीटीआयला दिलेल्या एका पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे. हा मुद्दा सध्या सोशल मीडिया आणि क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. पुढे गंभीरबद्दल बोलताना त्याने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.