
Harbhajan Singh MS Dhoni Controversy: भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर समालोचन आणि राजकारण क्षेत्रात सक्रिय आहे. त्याने नुकतेच भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीबाबत खळबळजनक भाष्य केलं आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्याने धोनीसोबतच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली असून ते मित्र नसल्याचेही स्पष्ट केलं आहे.