निवड समिती व प्रशिक्षक चर्चा करत असताना १५ जणांचा आशिया चषक संघ जाहीर केला.
संजू सॅमसन, तिलक वर्मा यांना भज्जीच्या संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे.
यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या तीन सलामीवीरांची निवड झाली आहे.
Harbhajan Singh Names His India Squad for Asia Cup 2025 : निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी संघ निवडण्यासाठी गहन चर्चा करत आहेत. येत्या गुरुवारी संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी बीसीसीआय संघ जाहीर करण्याचा अंदाज आहे. ही संघ निवड जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक खेळाडूवरून बरीच चर्चा सुरू आहे आणि अशात भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने आशिया चषक स्पर्धेसाठीचा त्याचा संघ जाहीर केला आहे. भज्जीच्या या १५ संघातून चकीत करणारी बरीच नावं बाहेर बसवली गेली आहेत.