
माजी फिरकीपटू हरभजन सिंगने आशिया कप 2025 मधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर भारताने बहिष्कार टाकावा, अशी मागणी केली.
'पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही' हे विधान आठवून त्याने सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला.
पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध तणावपूर्ण असून जनभावना पाकिस्तानविरुद्ध आहे.
Harbhajan Singh demands India boycott Pakistan in Asia Cup 2025 : भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने भारतीय संघाला आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलं आहे. 'पाणी आणि रक्त एकत्रित वाहू शकत नाही,' या विधानाची त्याने आठवण करून दिली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध पुलवामा हल्ल्यानंतर अधिक ताणले गेले आहे आणि त्यामुळे पाकिस्तानसोबत कोणत्याच क्षेत्रात आघाडी नको, अशी जनभावना आहे. पण, त्याचवेळी आशिया चषक स्पर्धेत IND vs PAK सामना होणार आहे आणि त्यावरून हरभनज सिंगने संताप व्यक्त केला आहे.