२००८ IPL मध्ये हरभजन सिंगने श्रीसंतला कानाखाली मारल्याची घटना 'स्लॅपगेट' म्हणून प्रसिद्ध झाली.
या घटनेचे खरे फुटेज IPL संस्थापक ललित मोदी यांनी १८ वर्षांनंतर शेअर केले.
ललित मोदीने उघड केले की, हा व्हिडीओ सुरक्षा रक्षकाच्या कॅमेऱ्यात कैद झाला होता.
Harbhajan Singh’s slapgate moment with Sreesanth resurfaces : इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात श्रीमंत लीग आहे आणि त्याचसोबत या लीगशी अनेक वादही जोडलेले आहेत. २००८ पासून या लीगला सुरूवात झाली आणि पहिलेच पर्व गाजले ते हरभजन सिंग आणि एस श्रीसंत यांच्या वादाने. मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यात, MI च्या भज्जीने पंजाबचा वेगवान गोलंदाज श्रीसंतला थोबाडीत मारले होते. या घटनेला 'स्लॅपगेट' म्हणून ओळखले जाते. हे प्रकरण पुन्हा समोर येण्याचं निमित्त ठरलं ते, IPL चे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी शेअर केलेला व्हिडीओ...