hardik pandya and russian model elena tuteja dating rumours
hardik pandya and russian model elena tuteja dating rumourssakal

Hardik Pandya Dating Rumours: रशियन मॉडेलला डेट करतोय हार्दिक पांड्या? फोटो व्हायरल; जाणून घ्या संपूर्ण सत्य

Hardik Pandya Dating Rumour With Russian Model: हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. हार्दिक आणि नताशा घटस्फोट घेणार असल्याच्या अफवा सतत पसरत असतात.

Hardik Pandya Dating Rumours: हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. हार्दिक आणि नताशा घटस्फोट घेणार असल्याच्या अफवा सतत पसरत असतात.

मात्र, अद्याप दोन्ही बाजूंनी कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. दरम्यान, हार्दिक पांड्याचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्याच्या आधारे तो एका रशियन मॉडेलला डेट करत असल्याचे बोलले जात आहे.

hardik pandya and russian model elena tuteja dating rumours
Rohit Sharma : गुरु द्रविडचा पठ्ठ्या रोहित करणार होता 5 कोटींचे बलिदान पण... वाटणीवेळी काय घडलं नेमकं?

खरं तर, जेव्हा टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला तेव्हा रशियन मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री एलेना टुटेजाने तिच्या इंस्टाग्रामवर हार्दिक पांड्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता.

तिचा हा फोटो हार्दिक पांड्यासोबतच्या जाहिरात शूटमधील होता आणि भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तिने तो शेअर केला होता. यानंतर सोशल मीडियावर अनेक कमेंट येऊ लागल्या की अलिना ही हार्दिकची नवीन गर्लफ्रेंड आहे, कारण त्याचवेळी हार्दिकच्या नताशा स्टॅनकोविकपासून घटस्फोट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. काही लोकांनी हार्दिकसोबतच्या तिच्या फोटोला फोटोशॉप असेही म्हटले आहे.

hardik pandya and russian model elena tuteja dating rumours
India Support Staff: नवा ट्विस्ट! गंभीरने संपूर्ण भारतीय स्टाफचा हट्ट सोडला; परदेशी खेळाडूसाठी BCCIकडे लावला वशीला

हार्दिक पांड्या आणि एलेना टुटेजा यांच्या नात्याच्या अफवा पसरू लागल्यावर अभिनेत्रीने आणखी एक पोस्ट करून या सर्व बातम्यांचे खंडन केले. तिने सांगितले की, हार्दिक पांड्यासोबतचा तिचा फोटो फोटोशॉप केलेला नाही आणि ती हार्दिकला डेट करत नाही. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यात घटस्फोटाची अफवा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात दोन्हीकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com