

Hardik Should Step Down From Captaincy Manoj Tiwary
esakal
IPL 2026 controversy Hardik Pandya leadership criticism: मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लाजीरवाणी कामगिरी करता आलेली आहे. सहावे जेतेपद पटकावण्याचा निर्धार व्यक्त करून मैदानावर उतरलेल्या मुंबई इंडियन्सला पाच सामन्यांत फक्त एकच विजय मिळवता आला आहे आणि सलग चार पराभव पत्करावे लागले आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या लढतीत पंजाब किंग्सने सर्व आघाड्यांवर MI ला पाणी पाजले. संघात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सू्र्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या हे वर्ल्ड कप विजेते खेळाडू असूनही ही अवस्था आहे.