

HOW HARDIK PANDYA BECAME ALL ROUNDER
esakal
HOW HARDIK PANDYA BECAME ALL ROUNDER: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या चर्चेत आहे. दुखापतीमुळे हार्दिक बऱ्याच काळापासून संघापासून दूर आहे. आज त्याचा ३३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हार्दिकची प्रेयसी माहिका शर्माने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.
ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमधून माहिकाने हार्दिकच्या क्रिकेट प्रवासाबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. आज स्टार अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्दिकने क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख कशी निर्माण केली, याबद्दल तिने लिहिलं आहे.