HARDIK PANDYA CLEARED TO BOWL AND SET FOR T20I COMEBACK VS SOUTH AFRICA — REPORT
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याने BCCI च्या Centre of Excellence (CoE) मध्ये दुखापतीतून चांगले पुनर्वसन केले आहे आणि त्याला ट्वेंटी-२० सामन्यात गोलंदाजी करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत त्याचे पुनरागमन गृहित धऱले जात आहे. PTI ने दिलेल्या वृत्तानुसार ३२ वर्षीय हार्दिकने २१ ऑक्टोबर आणि ३० नोव्हेंबरला CoE ने घेतलेल्या Return to Play (RTP) चाचणी पास केल्या आहेत. त्यानंतर तो टी-२० क्रिकेट खेळण्यास तंदुरुस्त असल्याचे जाहीर केले गेले आहे.